स्थानिक प्रशासनच कोसळलंय, सुरक्षित राहा; अंधेरी दुर्घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

56

मुंबई, दि.३ (पीसीबी) – अंधेरी येथे पूल कोसळल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘कोसळणारे ब्रिज, रस्त्यांवर पूर, अडकलेले नागरिक. स्थानिक प्रशासनच कोसळलंय, मुंबईकरांबद्दल मला सहानुभूती आहे, सुरक्षित राहा’, अशी प्रतिक्रिया ट्विट करून दिली आहे.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळ असलेल्या पुलाचा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक खंडित झाल्याने कार्यालयात  जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून कोसळलेल्या पुलाचा ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पश्चिम आणि हार्बर मार्गाला जोडणारी लोकलसेवा दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होणार असून पश्चिम मार्गावरील अप आणि डाऊन जलदगती मार्गावरील लोकलसेवा संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम मार्गावरील अप आणि डाऊन स्लो मार्गाची सेवा मध्यरात्रीपर्यंत पूर्ववत होईल अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे.