स्त्रीवाद म्हणजे ब्रा जाळून मिशा वाढवणे नाही- सोनम कपूर

323

मुंबई, दि. १० (पीसीबी) –  समाज आणि स्त्रीवादावर आपले परखड भाष्य करण्यात प्रसिद्ध असणारी अभिनेत्री सोनम कपूरने पुन्हा एकदा स्त्रीवादावर आपले मत व्यक्त करत ढोंगी स्त्रीवादावर टीकास्त्र सोडले आहे. ब्रा जाळून मिशा वाढवणे म्हणजे स्रीवाद नाही, असे स्त्रीवादाचा खरा अर्थ सांगताना सोनमने आपली भूमिका मांडली आहे.

सोनम सांगते, ‘तू स्त्रीवादी आहेस का असा प्रश्न मला १२ वर्षांपूर्वी कुणीतरी विचारला होता. तेव्हा मी हो, मी स्त्रीवादी आहे असे म्हटले होते. ते ऐकून मी अशा प्रकारे मत व्यक्त करणे योग्य नसल्याचे माझ्या पीआर टीमने मला सांगितले होते. असे म्हटल्याने तुम्ही पारंपरिक वेषभूषेत कधीही वावरत नसल्याने तुम्ही खऱ्या स्त्रीवादी नसल्याची टीका तुमच्यावर होऊ शकते असे ते मला म्हणाले. आज तर सर्वजण आपण स्त्रीवादी असल्याचे सांगतात. १२ ते १५ वर्षांपूर्वी कोणतीही अभिनेत्री स्पष्टपणे आपण स्त्रीवादी असल्याचे म्हणत नव्हती.’

WhatsAppShare