स्कॉटलंडवरील विजयानंतर मेक्सिकोच्या फुटबॉल संघाने केली चक्क वेश्यांसोबत पार्टी

197

मेक्सिको, दि. ७ (पीसीबी) – स्कॉटलंडवरील विजयानंतर मेक्सिकोच्या संघाने चक्क तीस देहविक्री करणाऱ्या तरुणींसोबत पार्टी केली असल्याचे समोर आले आहे.

पार्टीमध्ये मेक्सिकोचे नऊ खेळाडू आणि तीस वेश्या होत्या. या खेळाडूंमध्ये गोलकिपर गुलेर्मो ओचोआ, रॉल जीमेन्झ, कार्लोस साल्सेडो, मार्को फॅबियन, जोनाथन आणि जिओव्हानी दोस सांतोस हे खेळाडू होते. मात्र या खेळाडूंवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असे मेक्सिकोच्या फुटबॉल संघटनेने सांगितले आहे.

यावेळी फूटबॉल संघटनेच्या अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले की आम्ही खेळाडूंना कोणतीही परवानगी दिली नव्हती. ही पार्टी करणे हा त्यांचा वैक्तिक निर्णय होता. आणि त्यांना मधल्या काळात मोकळा वेळ मिळाला असताना त्यांनी हे केले आहे. संघाशी संबंधित गोष्टी वगळता त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही केले तरी आम्ही काही करू शकत नाही, असे सांगत त्यांनी खेळाडूंवर कारवाई होणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले.