सौदीची तेल कंपनी अरामकोवर ड्रोन हल्ला

203

रियाध, दि. १४ (पीसीबी) – जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाच्या तेल कंपनी ‘अरामको’च्या दोन फॅसिलिटी सेंटर्समध्ये आग लागल्याची घटना घडली. दरम्यान, ही ‘अरामको’च्या फॅसिलिटी सेंटर्समध्ये लागलेली ही ड्रोन हल्ल्यामुळे ही लाग लागल्याची माहिती सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांनी दिली. पहाटे ४ वाजता झालेल्या गोळीबारालाही सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. ‘अबकॅक’ आणि ‘खुराइस’ येथील फॅसिलिटी सेंटर्सवर ड्रोन हल्ले करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रायाकडून देण्यात आली.

दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास सुरू केला असल्याचे सौदी अरेबियाच्या गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले. गेल्या महिन्यात अरामकोच्या नॅचरल गॅस फॅसिलिटीवरही हल्ला करण्यात आला होता. परंतु त्यामध्ये मोठे नुकसान झाले नव्हते. त्या हल्ल्याची जबाबदारी येमेनच्या एका दहशतवादी संघटनेने घेतली होती.

गेल्या काही महिन्यांमध्ये क्रॉस-बॉर्डर क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने सौदी अरेबियाच्या एअर बेसवरही हल्ले करण्यात आले होते. शनिवारी अरामकोवर करण्यात आलेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारली नाही. मे महिन्यापासूनच आखाती क्षेत्रामध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. जून महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईराणवर हवाई हल्ला करण्याची घोषणा केली होती. परंतु नंतर त्यांनी आपला निर्णय बदलला होता.

 

WhatsAppShare