सोसायटीच्या परिसरात वॉकिंग करत असलेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावला

123

देहू, दि. १(पीसीबी) – सोसायटीच्या आतील बाजूस वाॅकिंग करत असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन अनोळखी चोरट्याने चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 26) सायंकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास इंद्रायणी पार्क सोसायटीच्या आतील रोडवर घडली.

अमेय आशिष जलतारे (वय 20, रा. इंद्रायणी सोसायटी, देहूगाव) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या इंद्रायणी सोसायटीच्या आतील बाजूस असलेल्या रस्त्याने वॉकिंग करत होते. ते फोनवर बोलत चालत असताना दुचाकीवरून आलेल्या एका अनोळखी इसमाने फिर्यादी यांचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.