सोशल मीडियावर महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

1

पिंपरी, दि. 13 (पीसीबी) – व्हाट्सअप या सोशल मीडियावर दोन तरुणांनी एका महिलेचा मोबाईल क्रमांक शेअर केला. तसेच महिलेच्या व्हाट्सअपवर अश्लील व्हिडिओ पाठवून तिचा विनयभंग केला. याबाबत दोन तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 5 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 या कालावधीत घडला.

कुणाल दीक्षित (वय 26), अर्जुन राजपूत (वय 22) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 40 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 12) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित महिलेचा मोबाईल क्रमांक व्हाट्स अप या सोशल मीडियावरील काही ग्रुपमध्ये शेअर केला. त्याद्वारे महिलेची बदनामी केली. तसेच आरोपींनी महिलेला अश्लील शिवीगाळ व अश्लील व्हिडिओ पाठवून त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत दोन तरुणांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 354, 507, 34, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare