सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होणार शिरूश्री सेकिया हीच शिव तांडव नृत्य एकदा पहाच

38

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपल्यातल्या सुप्त कलांना संपूर्ण जगासमोर मांडत असतात. काही अप्रतिम गायक, गायिका असतात तर काही आपल्यातल्या सेन्स ऑफ ह्युमरला कॉमेडीतून चालना देतात. यु ट्युबवर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. असाच एक यु ट्युबवरचा नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

यूट्यूबच्या जगात अनेक सुपरस्टारदेखील आहेत. ज्यांना लाखो-कोटींमध्ये व्ह्यूज मिळतात. अशातच यूट्यूबवर शिरूश्री सेकिया हिचा एक नृत्याचा व्हिडीओ असून यात तिने धमाकेदार नृत्य केलं आहे. डान्सचा हा फॉर्म तांडव आहे. शिरूश्री सेकिया शिव तांडव स्तोत्रावर तांडव करताना दिसत आहे. शिरूश्री सेकिया हिचे हावभाव आणि नृत्य करण्याचा अंदाज अतिशय भन्नाट आहे. हा व्हिडीओ डान्स अकॅडमीने सादर केला आहे. या नृत्याची कॉन्सेप्ट आणि कोरियोग्राफी दोन्ही शिरूश्री सेकिया हिने केली आहे. हा व्हिडीओ 15 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

दरम्यान, शिरूश्री सेकिया हिच्या या डान्स व्हिडीओवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्यानं लिहिलं आहे की, मी पहिल्यांदा कोणाला इतक्या ऊर्जेसह नृत्य करताना पाहत आहे. तांडव हा महत्त्वाचा नृत्यप्रकार आहे. मात्र तो इतर नृत्यप्रकारांच्या तुलनेत फार प्रसिद्ध नाही. तांडव या नृत्यप्रकारात उग्र हावभाव केले जातात. तर, तिच्या नृत्यानं बघणाऱ्यांच्या अंगावर अक्षरक्ष: रोमांच उभे राहिले आहेत.

WhatsAppShare