सोबत व्यवसाय करण्यास नकार दिल्याने तरुणीचा विनयभंग

66

भोसरी, दि. ११ (पीसीबी) – केटरिंग काम सोबत करण्यास नकार दिल्याने तरुणीला मारहाण केली. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केला. दापोडी येथे गुरुवारी (दि. 7) रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी पीडित 19 वर्षीय शनिवारी (दि. 9) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शम्मा सनी पवार आणि सनी पवार (दोघेही रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केटरिंग काम सोबत करण्यास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून शम्मा पवार हिने मारहाण करून फिर्यादीच्या अंगावर नखाने ओरखडले. तसेच सनी पवार याने मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून फिर्यादीचा विनयभंग केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare