सोफासेट, टीव्ही, किचन ट्रॉली घेण्यासाठी माहेरुन पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

49

मोशी, दि. २१ (पीसीबी) – सोफासेट, टीव्ही घेण्यासाठी तसेच घरात किचन ट्रॉली बनवून घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर 2020 ते 20 जून 2021 या कालावधीत बो-हाडेवाडी, मोशी येथे घडली.

याबाबत पीडित विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अकबर मेहबूब तांबोळी (वय 28), दीर ईलाही मेहबूब तांबोळी (वय 28), आणि सासू (सर्व रा. बो-हाडेवाडी, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता सासरी नांदत असताना आरोपींनी तिला घरात व्यवस्थित काम करत नाही, तसेच सोफासेट, टीव्ही माहेरहून आणण्यासाठी, घरात किचन ट्रॉली बनवून घेण्यासाठी व इतर कारणांसाठी पैशांची वेळोवेळी मागणी केली. त्यावरून आरोपींनी पीडित महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare