सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच; भरदिवसा महिलेचे मंगळसुत्र हिसकावले

1

मोशी, दि. १० (पीसीबी) – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका महिलेचे 90 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 9) दुपारी पावणे पाच वाजता बो-हाडेवाडी, मोशी येथे किडस झी शाळेसमोर घडली.

वैशाली विलास ठाकूर (वय 50, रा. स्पाईन रोड जवळ, चिखली. मूळ रा. पालघर) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठाकूर शनिवारी दुपारी पावणे पाच वाजताच्या सुमारास बो-हाडेवाडी मोशी येथे रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्या किड्स झी शाळेसमोर आल्या असता त्यांच्या समोरून एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 90 हजारांचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare