सूर्यकांत भांडेपाटील यांची कहाणी मोठ्या पडद्यावर; इम्रानची प्रमुख भूमिका

195

मुंबई, दि. ६ (पीसीबी) –  सूर्यकांत भांडे पाटील, अनेकांना हे नाव माहित असेल, पण काही जण या नावापासून अनभिज्ञही असतील. लवकरच सूर्यकांत भांडेपाटील यांची कहाणी मोठ्या पडद्यावर पाहियला मिळणार आहे.१२० मुलांच्या अपहरणाची प्रकरण मोफत सोडवणाऱ्या सूर्यकांत भांडेपाटील यांची कथा ‘फादर्स डे’ या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या सिनेमात अभिनेता इम्रान हाश्मी सूर्यकांत भांडे पाटील यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर शांतनू बागची या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. याशिवाय एअरलिफ्ट, पिंक आणि रेडचे डायलॉग लिहिणारे रितेश शाह यांच्याकडे संवादाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसंच इम्रान हाश्मी, प्रिया गुप्ता आणि कल्पना उद्यवार हे चित्रपटाचे निर्माते आहेत.

“१२० मुलांच्या अपहरणाची प्रकरणं मोफत सोडवणारे भारताचे टॉप गुप्तहेर सूर्यकांत भांडेपाटील यांच्या आयुष्यावरील ‘फादर्स डे’ या सिनेमाची घोषणा करताना मला अतिशय आनंद होत आहे,” अशी प्रतिक्रिया इम्रान हाश्मीने ट्विटरवर दिली आहे.