सुसाइड नोटमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

69

सुसाइड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन यवतमाळमधील एका शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाखोंच्या कर्जाचा डोंगर आणि नापिकी यातून निराश झालेल्या या शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

शंकर भाऊराव चायरे (वय ५०, रा. युवतमाल, ता. राजूरवाडी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, शंकर भाऊराव चायरे यांची सहा एकर शेती होती. त्यांनी यावर्षी कापूस आणि तूर याची लागवड केली होती. मात्र बोंड अळीने त्यांचे सगळे पिक उद्धवस्त केले. त्याआधी २०१६-१७ या वर्षातही त्यांच्यावर ८० हजारांचे कर्ज होते. असे एकूण त्यांच्यावर तीन लाखांचे कर्ज होते. या सगळ्यातून आलेल्या निराशेतून आणि हतबलतेतून शंकर चायरे यांनी विष प्राशन करुन त्यांचे आयुष्य संपवले. आत्महत्या करण्याआधी त्यांनी एक सहा पानी सुसाइड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव लिहून ठेवले होते त्यामध्ये चायरे यांनी त्यांच्या ‘आत्महत्येला नरेंद्र मोदी सरकार जबाबदार आहे’, असा उल्लेख केला आहे. पुढील तपास राजूरवाडी पोलीस करत आहेत.