सुशीलकुमार शिंदे स्वतः थकले आहेत – अजित पवार

154

पुणे, दि. ९ (पीसीबी) – सुशीलकुमार शिंदे स्वतः थकले आहेत. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष थकलेले नाहीत, थकणारही नाहीत, असे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.   

पुण्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा मेळावा आज (बुधवार) झाला. पवार बोलत होते. काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांनी सोलापूरमध्ये एका सभेत बोलताना राष्ट्रवादी- काँग्रेस दोन्ही पक्ष आता थकले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे भविष्यात विलिनीकरण होईल, असे म्हटले होते. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या नेत्याना प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाताना, चांगल्या प्रकारे संवाद साधावा. तसेच काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार , देखील तेवढ्याच निष्ठेने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

WhatsAppShare