सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणात अखेर सत्य काय बाहेर आले पहा…

56

मुंबई, दि. २९ (पीसीबी) : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाल्याचा दावा अनेकांकडून करण्यात येत आहे. सुशांतने आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं होतं. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही सुशांतचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याच्या व्हिसेरा रिपोर्टमधूनही सुशांतच्या शरीरात कोणत्याच प्रकारचं केमिकल किंवा विष सापडलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. अशातच सोमवारी रात्री उशीरा एम्सच्या फॉरेन्सिक टीमने सीबीआयडे यासंदर्भाती आपला अहवाल सोपावला आहे.
एम्सने दिलेल्या अहवालातून असा दावा करण्यात आला आहे की, सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू विष प्राशन केल्यामुळे झालेला नाही. एम्सच्या अहवालात सांगण्यात आलं आहे की, सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे केमिकल्स किंवा विष आढळून आलेलं नाही. तसेच एम्स रुग्णालयातील फॉरेन्सिक टीमने कूपर रूग्णालयाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर प्रश्नही उपस्थित केले आहेत. आता सीबीआय एम्सने दिलेल्या या अहवालाच्या आधारे आपल्या तपासाची पुढची दिशा ठरवणार आहे.

कूपर रूग्णालयाच्या अहवालावर प्रश्न
रिपोर्टनुसार, एम्सच्याने दिलेल्या अहवालात कूपर रुग्णालयाला क्लीन चिट दिलेली नाही. एम्सच्या रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, कूपर रूग्णालयाने पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये टायमिंग दिलेला नाही. मेडिकल टीमचे चेअरमन डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले की, अंतिम रिपोर्टसाठी काही कायदेशीर बाबी पडताळाव्या लागतील.
सुशांतचा मृत्यू विष प्राशन केल्यामुळे झाल्या या चर्चांना पूर्णविराम

एम्सने दिलेल्या अहवालातून समोर आलेल्या बाबींमुळे सर्व शंकांवर पूर्णविराम लागला आहे. सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृत्यू नाही तर त्याची हत्या झाली आहे. त्याला विष देण्यात आलं होतं, यांसारख्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. एम्सने दिलेल्या अहवालात सांगण्यात येत आलं आहे की, सुशांतचा मृत्यू विष प्राशन केल्यामुळे झालेला नाही, त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारच्या विषाचे अंश सापडलेले नाहीत. त्यामुळे आता सर्वच चर्चा आणि शंकाना पूर्णविराम मिळाला आहे.

WhatsAppShare