सुरेखा पुणेकर यांच्या पाठोपाठ आणखी ‘एक’ प्रसिद्ध कलाकार राष्ट्रवादीच्या वाटेवर

154

पुणे, दि.१४ (पीसीबी) : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या पाठोपाठ लोककलावंत गायक शांताबाई फेम संजय लोंढे यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 16 तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर कलाकारांचं इनकमिंग सुरु होणार असल्याची चर्चा आहे. शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार करणार आहेत. येत्या 16 तारखेला मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार कलाकारांकरिता काम करण्याची इच्छा संजय लोंढे यांनी बोलून दाखवली आहे.

संजय लोंढे यांचं शांताबाई हे गीत खूपच लोकप्रिय झालं. सगळ्या महाराष्ट्राने त्यांचं गीत डोक्यावर घेतलं. काही दिवसांत ते तुफान लोकप्रिय झाले. त्यानंतर त्यांना गाण्याच्या, कार्यक्रमाच्या अनेक सुपाऱ्या मिळाल्या. पण दरम्यानच्या काळत त्यांची लोकप्रियता कमी झाली किंबहुना ती घटली… आता पुन्हा एकदा संजय लोंढे प्रसिद्धच्या झोतात आले आहेत. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 16 सप्टेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश सोहळा होणार आहे. सुरेखा पुणेकरांबरोबर एकूण 12 कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुरेखा पुणेकर यांनी दिली आहे.

लावणी सम्राज्ञी म्हणून सुरेखा पुणेकरांची ओळख आहे. लावणीला महाराष्ट्रासह परदेशातही त्यांनी मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. वयाच्या आठव्या वर्षीच त्यांनी पायात घुंगरू बांधलं आणि लावणी कार्यक्रमांना सुरुवात केली. नटरंगी नार हा त्यांचा कार्यक्रम राज्यभरात सगळीकडे गाजला. या रावजी तुम्ही बसा भावजी , पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, कारभारी दमानं या त्यांच्या लावण्या खूप गाजल्या आहेत. 2019 ला पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसमधून त्यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. तर बिग बॉस या स्पर्धेतही त्या सहभागी झाल्या होत्या. अखेर त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

संजय लोंढे लोककलावंत, गायक आहेत. ‘शांताबाई’ हे त्यांनी गायलेलं गीत खूपच प्रसिद्ध झालं. संपूर्ण महाराष्ट्राने शांताबाई गीत डोक्यावर घेतलं, त्यांना दरम्यानच्या काळात अमाप प्रसिद्धी मिळाली. पुण्यात एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म, सध्याही गरिबीत दिवस व्यतित करतायत, पण राजकारणात येऊन कलावंतांसाठी काम करण्याची इच्छा

WhatsAppShare