सुरतमध्ये २२ सप्टेंबर रोजी भारतातील पहिल्या ‘पाद स्पर्धे’चे आयोजन

358

सुरत, दि. १५ (पीसीबी) – पादण्याच्या सवयीमुळे अनेकांची चारचौघात चांगलीच कुचंबणा होती. त्यामुळे असे लोक एकांत असणाऱ्या ठिकाणाच्या शोधात असतात.  पण आता  पादणाऱ्यांसाठी  आता एक मोकळे रान मिळणार आहे. कारण भारतात पहिलीच ‘पाद स्पर्धा’ आयोजित करण्यात  आली आहे. ‘व्हॉट द फार्ट’ ही स्पर्धा सुरतमध्ये २२ सप्टेंबर रोजी  होणार आहे.

गायक व अभिनेता यतिन संगोई आणि त्यांचे सहकारी मुल संघवी यांनी ही अनोखी  स्पर्धा आयोजित केली आहे.  याबाबत यतिन यांनी सांगितले की,  माझ्या कुटुंबीयांसोबत सिनेमा बघायला गेलो होतो तेव्हा चित्रपटगृहात मी मोठ्याने पादलो. एकजण माझ्यावर हसला आणि म्हणाला की पादण्याची स्पर्धा असल्यास तुम्हीच त्यात जिंकणार. त्यावेळी माझ्या डोक्यात या स्पर्धेविषयीचा विचार आला.

चीन, अमेरिका या देशांमध्ये पादण्याच्या स्पर्धा होतात.  तसेच त्याचा वर्ल्ड कपसुद्धा आहे. पण भारतात आतापर्यंत अशी स्पर्धा झालेली नाही. या स्पर्धेत मोठ्या आवाजात व एका लयात पादणाऱ्या व्यक्तीला ट्रॉफीसोबतच पाच ते पंधरा हजार रुपयांपर्यंत बक्षीस मिळणार आहे. १०० रुपये फी भरून या स्पर्धेसाठी नोंदणी करता येणार आहे.

WhatsAppShare