सुरक्षा रक्षकाला दमदाटी करत कंपनीच्या ऑफिसमधील साहित्याची चोरी

75

हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) – सुरक्षा रक्षकाला मारण्याची धमकी देऊन चार जणांनी मिळून कंपनीच्या ऑफिसमधून टीव्ही, प्रिंटर,कॉम्प्युटर मॉनिटर, कॅमेरे आणि हजेरी मशीन असे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 18) सकाळी सव्वानऊ वाजता बाणेर येथील फूडनेस्ट नावाच्या कंपनीत घडली.

अमितेश प्रकाश देशमुख (वय 41, रा. रामनगर कॉलनी, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजिंक्य क्रांतीलाल गायकवाड (वय 19, रा. पाषाण, पुणे) आणि अन्य तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची फूडनेस्ट नावाची कंपनी आहे. मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या कंपनीत आले. त्यांनी सुरक्षा रक्षक मिथिलेश शर्मा यांना मारण्याची धमकी दिली. अनधिकृतपणे कंपनीच्या ऑफिसमध्ये प्रवेश करून ऑफिसमधून एलईडी टीव्ही, प्रिंटर, कॉम्प्युटर मॉनिटर, नऊ कॅमेरे आणि हजेरी मशीन असे 34 हजार 500 रुपयांचे साहित्य जबरदस्तीने चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे तपास करीत आहेत.