सुरक्षा कवचासाठी डाक सेवकांची डॉ. अमोल कोल्हेंकडे धाव

39

मंचर , दि. १२ (पीसीबी) – कोरोनाच्या महाभयंकर संकटात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांना पोस्टाचे खाते बाह्य कर्मचारी ५० लाख रुपयांचे विमा कवच मिळावे. या मागणीसाठी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा.’ अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना पुणे ग्रामीणचे अध्यक्ष महेंद्र राऊत व सचिव एकनाथ मंडलिक यांनी ईमेलद्वारे केली होती ..
राऊत म्हणाले ‘ग्रामीण डाकसेवक हे गेल्या तीस ते ४० वर्षापासून ग्रामीण भागात पोस्टमन म्हणून उन्हाळा, पावसाळा व थंडीतही घरोघरी जाऊन महत्वाची कागदपत्रे देण्याचे काम करत आहेत. पण अजून पोस्ट खात्याने डाकसेवकांचा पोस्ट खात्यात समावेश केलेला नाही. कार्यालयात बसून काम करणार्यांचा सन्मानपूर्वक पोस्ट खात्यात समावेश केला आहे. आम्हाला सावत्रपनाची वागणूक दिली जात आहे असं म्हटलं होत .. कोविड महामारीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पण जीव धोक्यात घालून ग्रामीण डाकसेवक दारोदारी फिरून पत्र, रजिस्टर, मनीऑर्डर, मेडिसिन पार्सल वाटप करत आहेत. त्यातूनच डाक सेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.. यासाठी ‘टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे वीमा संरक्षण द्या; डॉ. अमोल कोल्हे यांची केंद्र सरकारकडे मागणी केली आहे

WhatsAppShare