सुजयच्या उमेदवारीबाबत मी हट्ट धरत नाही – राधाकृष्ण विखे-पाटील

191

नाशिक, दि. ९ (पीसीबी) – काँग्रेस व राष्ट्रवादीतील जागांचा तिढा  अद्यापही सुटलेला नाही, असे सांगून आपल्या मुलाने निवडणूक लढविण्याची मागणी केली  आहे. त्यामुळे मी हट्ट धरत आहे, असे काही नाही, असे   काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी  स्पष्ट केले.   

विखे-पाटील एका कार्यक्रमासाठी  नाशिकला आले असता विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी  ते म्हणाले की,  नगरमधून निवडणूक लढवण्यासाठी सुजय विखे-पाटील इच्छुक आहेत.  त्याबद्दल एकत्रित बसून निर्णय घ्यावा लागणार आहे.  लोकसभेच्या  काही जागांबद्दल अजूनही संदिग्धता आहे.

लोकसभा जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय येत्या दोन- चार दिवसांत आघाडीच्या नेत्यांच्या बैठकी होणार आहे. नगर आणि औरंगाबाद जागांची अदला बदल होण्याबाबतची चर्चा   माध्यमांतून वाचली आहे, असे त्यांनी  सांगितले.