सुंदर दिसणाऱ्या शिक्षिका पत्नीकडे कोणी पाहू नये, म्हणून पतीने केला तिचा चेहरा विद्रूप   

933

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – एका व्यक्तीने स्वतःच्याच सुंदर दिसणाऱ्या पत्नीवर इतर पुरुषांची वाईट नजर पडू नये, म्हणून तिचा चेहराच विद्रूप केल्याची धक्कादायक घटना समोर आली  आहे. या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.राज रायकवार असे या व्यक्तीचे नाव आहे.  तो मूळ मध्य प्रदेशमधील जबलपूरचा रहिवासी आहे. नोकरीनिमित्त तो मुंबईत राहतो पण त्याची पत्नी आणि मुले जबलपूरमध्येच राहतात. राज हा ड्रायव्हर असून चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लागणाऱ्या कॅमेऱ्यांची ने – आण करण्याचे  काम करतो.

जबरपूरमध्ये राहत असलेल्या आपल्या सुंदर दिसणाऱ्या पत्नीवर कुणाची तरी वाईट नजर पडेलष अशी भीती त्याला नेहमी वाटायची. या भीतीतून त्याने एक दिवस मच्छर मारण्याच्या कॉईल लावायला वापरण्यात येणाऱ्या पत्र्याच्या स्टँडच्या सहाय्याने पत्नीच्या चेहऱ्यावर वार केले आणि तिचा चेहरा विद्रूप केला. त्याची पत्नी शिक्षिका  असून तिने राजविरोधात जबलपूरमध्ये गुन्हा दाखल केला होता.

मात्र, दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी  त्याला मुंबईतील सहार परिसरातील एका चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यानंतर  त्याने आपल्या पत्नीसोबत केलेले धक्कादायक  कृत्य उघडकीस आले.