सीरियात रासायनिक हल्ला; ७० नागरिकांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश

82

सीरियातील बंडखोर नियंत्रित भाग दूमा येथे संशयित रासायनिक हल्ला झाल्याचे आज रविवारी समोर आले आहे. या हल्ल्यात चिमुकल्यांसह ७० जणांचा मृत्यू झाला असून इतर अनेकांवर उपचार सुरू आहेत.

बचाव मोहिम राबविणारी संस्था व्हाइट हेलमेटने ट्वीट करून ही माहिती जाहीर केली. सोबतच कथित रासायनिक हल्ल्यानंतर मृत आणि जखमींचे फोटो सुद्धा पोस्ट केले. पण, कुठल्याही अधिकाऱ्याने या हल्ल्याच्या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला नाही. विशेष म्हणजे, व्हाइट हेलमेटने यापूर्वी १५० जणांच्या मृत्यूचा दावा करणारे ट्वीट केले होते. पण, काही वेळातच ते ट्वीट डिलीट करण्यात आले.