सीएए कायद्याला विरोध करणारे दलितविरोधी आहेत – अमित शहा

90

नवी दिल्ली,दि.१९(पीसीबी) – सीएए विरोधात असलेले दलित-विरोधी असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी म्हटलं आहे. तसेच मुस्लिमांचं नागरिकत्व काढून घेतलं जाईल असा कोणताही कलम या कायद्यामध्ये नाही. राहुल गांधी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे भारतीय नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार आहे हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सिद्ध करून दाखवावं, असं आव्हान अमित शहा यांनी दिलं आहे.

राहुल गांधी यांनी सीएए पूर्णपणे वाचावा, भारतीय मुस्लिमांचे नागरिकत्व हिरावून घेण्याबाबत त्यामध्ये काही आढळलं तर संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी त्याबाबत अपल्याशी वादविवाद करण्यास तयार आहेत, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.