सिद्धू यांचा शिरच्छेद करणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस देणार – बजरंग दल

108

आग्रा, दि. २१ (पीसीबी) – काँग्रेस नेते आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांना अलिंगण दिल्यामुळे बजरंग दलाने सिद्धू यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून बजरंग दलाचा आग्रा जिल्हाध्यक्ष संजय जाट याने सिद्धू यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५ लाखांचे इनाम देण्यात येईल अशी घोषणा केली आहे.