सिक्कीम डेमोक्रेटीक पार्टी च्या १० आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

106

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीनंतर भाजप पक्ष संघटनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. देशाच्या पूर्वेकडील राज्य सिक्किममधील सिक्कीम डेमोक्रेटीक पार्टी  च्या १०  आमदारांनी  भाजपमध्ये आज (मंगळवार)  प्रवेश केला.

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा आणि  ज्येष्ठ नेते राम माधव यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

एसडीएफचे आमदार भाजपमध्ये गेल्याने माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांना मोठा धक्का मानला जात आहे.  चामलिंग यांनी सिक्किमचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद सांभाळले आहे.  यावर्षी मेमध्ये झालेल्या निवडणुकीत  एसडीएफला  मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे.