सिंहगड घाट रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली; पर्यटकांसाठी गडावर जाणारा रस्ता बंदच

34

पुणे, दि. १४ (पीसीबी) – सिंहगड घाट रस्त्यावर गेल्या रविवारी पहाटे ज्या ठिकाणी दरड कोसळली होती, त्याच ठिकाणी आज (शनिवारी) पहाटे पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. गेल्या रविवारी पहाटेच्या सुमारास उंबरदांड पॉइंटवर मोठी दरड कोसळली होती. तेव्हापासून पर्यटकांसाठी गड़ावर जाण्यासाठीचा रस्ता बंद करण्यात आला होता.

सिंहगड घाट रस्त्यावर पायथ्यापासून आठ किलोमीटरवर उंबरदांड दरड पॉइंट आहे. गेल्या रविवारी पहाटे दरड कोसळली. सर्व रा़डारोडा रस्त्यावर आला होता. तो हटविण्याचे काम वन विभागाकडून केले जात होते. त्यामुळे गेल्या एक आठवड्यापासून रस्ता बंद होता. येथील राडारोडा काढण्याचे काम पुर्ण झाले होते. सुरक्षेसाठी अजून पर्यटकांच्या वाहनांना गडावर जाण्यास परवाणगी देण्यात आली नव्हती. आज त्याच जागी रात्री पुन्हा दरड कोसळली. सर्व राडारोडा रस्त्यावर आल्याने तो पुन्हा बंद झाला आहे.

याबाबत वन विभागाचे अधिकारी महेश भालेराव यांनी सांगितले की, गेल्या रविवारी ज्या ठिकणी दरड कोसळली होती, त्याच ठिकाणी आज (शनिवारी) पहाटे पुन्हा दरड कोसळली आहे.