सास-याला शेतात जाऊन मारहाण; सुनेसह चौघींवर गुन्हा दाखल..

200

चाकण, दि. १६ (पीसीबी) – शेतात काम करत असलेल्या सास-याला शेतात जाऊन सुनेने, तिच्या आईने मारहाण केली. याप्रकरणी चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 14) दुपारी तीन वाजता गवारवाडी पाईट येथे घडली.जया संपत डांगले, संगीता वसंत गोरडे, लता वसंत गोरडे, साहिली राम गोरडे (सर्व रा. गोसासी, पोस्ट कनेरसर, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी संभाजी विठोबा डांगले (वय 50, रा. गवारवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जया ही फिर्यादी यांची सून आहे. संगीता आणि लता या जयाच्या आई आहेत. साहिली ही जयाची भावजय आहे. फिर्यादी हे शनिवारी दुपारी शेतात काम करत असताना आरोपी महिला शेतात आल्या. त्यांनी फिर्यादी यांना काठीने व केबलच्या वायरने मारहाण करून जखमी केले. शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत