सास-याला शिव्या दिल्याने जावयाला बेदम मारहाण; मेहुण्यावर गुन्हा दाखल

115

पिंपरी, दि.२३ (पीसीबी) : जावयाने सास-याला शिव्या दिल्या. त्याचा जाब विचारत मेहुण्याने जावयाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी मेहुण्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 19) रात्री साडेआठ वाजता पिंपळे सौदागर येथे घडली.

दिलीपकुमार गुप्तेश्वरनाथ पांडे (वय 33, रा. वडगाव मावळ) असे मारहाण झालेल्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेहुणा रोहित राजेंद्रनाथ जस्वाल (रा. पिंपळे सौदागर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी सासरी आले होते. त्यावेळी आरोपी मेहुणा रोहित याने ‘माझ्या वडिलांना शिवीगाळ का केली’ असे म्हणून हॉकी स्टिकने फिर्यादी यांच्या पायावर, हातावर, कमरेवर, मांडीवर मारून जखमी केले. त्यानंतर फिर्यादी गाडीवरून पडले असता त्यांच्या पायाला गाडीचा सायलेन्सरने भाजून जखम झाली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare