सासवडमध्ये माजी उपसरपंच संतोष दळवींचा दगडाने ठेचून खून

2067

सासवड, दि. १ (पीसीबी) – सासवड येथील भिवरी गावचे माजी उपसरपंच संतोष साधू दळवी (वय ३६) यांचा दगडाने ठेचून निघृर्ण खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि.३१) रात्री साडेनऊच्या सुमारास सासवड येथील भिवरी गावात घडली.

याप्रकरणी संतोष यांचे वडिल साधून अनंता दळवी यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष दळवी यांचे काही वर्षांपूर्वी काही अज्ञात लोकांसोबत भांडणे झाली होती. या कारणावरुन मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी संतोष यांचा दगडाने ठेचून खून केला आणि पसार झाले. सासवड पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.