सावरकांच्या गौरवाचा प्रस्ताव आणल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जाहीर सत्कार करू – नितेश राणे

77

मुंबई,दि.२६(पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकांच्या गौरवाचा प्रस्ताव आणल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू, असं भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाच्या प्रस्तावावरून आज विधानसभेत गदारोळ झाला. यावरून नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाच्या प्रस्तावावरून भाजपने आज विधानसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

सावरकरांबद्दल माहिती घेतल्यानंतर त्यांच्याबाबत माझं मत बदललं आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.