सावधान; ‘हा’ नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाल्यास तात्काळ डिलीट करा !

155

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या  (युआयडीएआय)   नावे हेल्पलाईन क्रमांक ऑटो सेव्ह झाला आहे. 18003001947 हा क्रमांक तुमच्या मोबाईल कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह झाला असेल तर खबरदारी घ्या. कारण युआयडीएआयने  या क्रमांकाशी आपला काहीही संबंध नाही, असे स्पष्ट केले आहे.

आम्ही एकाही मोबाईल सेवा देणाऱ्या कंपनीला या नावाने हा क्रमांक सेव्ह करण्यास सांगितलेले नाही, असे युआयडीएआयने  म्हटले आहे. 18003001947 हा किंवा 1947 हा क्रमांक सेव्ह करण्यास आम्ही सांगितलेले नाही असे ट्विट युआयडीएआयने केले आहे. तर हा गोपनीयता भंग करण्याचा प्रकार असू शकतो, अशी शक्यता सायबर तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

18003001947 हा क्रमांक जर मोबाईलमध्ये सेव्ह झाला असेल, तर तो डिलिट करा. सुरूवातीला काही  मोबाईल कंपन्या हा मोबाईल क्रमांक डिलिट करण्यासही नकार देत होत्या. मात्र, आता हा क्रमांक डिलीट होतो आहे. त्यामुळे हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये आला असेल, तर तो तातडीने डिलिट करा, असे आवाहन युआयडीएआयने केले आहे.