सावधान !!! वेटरने एटीएम कार्डचे क्लोनिंग करून चोरी केली

0

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – हॉटेलमध्ये बिल भरण्यासाठी दिलेल्या एटीएम कार्डचे क्लोनिंग करून त्याआधारे पैसे काढून घेण्याचे प्रकार वाढत आहेत. भोसरी येथे एका हॉटेलमध्ये असा प्रकार घडल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत पिंपळे निलख येथे दुसरा प्रकार उघडकीस आला आहे. पिंपळे निलख येथील वाघजाई हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या दोन ग्राहकांच्या एटीएम कार्डचे क्लोनिंग करून त्याआधारे त्यांची 53 हजार 900 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

वाघजाई हॉटेलमधील अनोळखी वेटर, कॅप्टन विरोधात याप्रकरणी चोरी आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दयानंद प्रकाश किरोळकर (वय 30, रा. पुनावळे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरोळकर 7 जानेवारी रोजी दुपारी पिंपळे निलख येथील वाघजाई हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी बिल भरण्यासाठी एटीएम कार्ड वेटरकडे दिले. वेटरने एटीएम कार्डचा डेटा क्लोन केला. तसेच पिन नंबरची चोरी केली. त्या माहितीच्या आधारे दुसरे एटीएम कार्ड तयार केले. बनावट एटीएम कार्ड द्वारे किरोळकर यांच्या बँक खात्यातून 38 हजार रुपये काढून घेतले.

असाच प्रकार आकाश रामेश्वर खोकर यांच्या सोबत देखील झाला आहे. त्यांच्या बँक खात्यातून 15 हजार 900 रुपये काढून घेण्यात आले. दोन्ही मिळून एकूण 53 हजार 900 रुपये वेटरने काढून घेतले.

WhatsAppShare