सावधान… भोसरीत बनावट नोटा

125

भोसरी दि. २९ (पीसीबी) – बनावट चलनी नोटा बाळगून काही नोटा बाजारात वापरल्या. हा प्रकार गुरुवारी (दि. 28) सायंकाळी महात्मा फुलेनगर पिंपरी येथे उघडकीस आला आहे. पोलिसांनी 200 रुपये दराच्या 48 नोटा जप्त केल्या आहेत.

गणेश दादू जाधव (वय 32, रा. एमआयडीसी भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी दरोडा विरोधी पथकातील पोलीस शिपाई विनोद वीर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 200 रुपये दराच्या 48 बनावट चलनी नोटा खोट्या असल्याचे माहिती असतानाही स्वतःजवळ बाळगल्या. त्या नोटांचा वापर चालना व्हावा या उद्देशाने काही बनावट चलनी नोटांचा वापर बाजारात केला. हा प्रकार पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाच्या निदर्शनास आला. पोलिसांनी आरोपी गणेश जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 200 रुपये दराच्या 48 नोटा जप्त केल्या.

आरोपी गणेश जाधव याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 489 (बी), (सी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare