सावधान !!! नागपूर-पुणे धावणाऱ्या ट्रॅव्हल बसमध्ये धक्कादायक प्रकार

1

पुणे, दि. ११ (पीसीबी) – संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवणारी एक घटना उघडकीस आली आहे. नागपूर ते पुणे या मार्गावर धावणाऱ्या एका ट्रॅव्हल्समध्ये क्लिनरनेच २१ वर्षीय प्रवासी तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ही घटना प्रवासादरम्यान घडली असती तरी पीडित तरुणीने बसमधून उतरल्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांमध्ये धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये वर्ग केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यातील एका गावांमध्ये राहणारी ही तरुणी रांजणगाव एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत नोकरी करते. बहिणीचा लग्नानिमित्त ती भंडारा जिल्ह्यातील आपल्या गावी गेली होती. बहिणीचे लग्न आटोपल्यानंतर नागपूर पुणे ट्रॅव्हल्स ने परत येत असताना हा प्रकार घडला.

प्रवासादरम्यान या ट्रॅव्हल्सचा क्लिनर समीर देवकर (वय २५) याने पीडित तरुणीच्या शेजारी येऊन तोंड दाबून चाकूचा धाक दाखवला आणि तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला आहे. सहा जानेवारीला ही ट्रॅव्हल सकाळी पुण्यात पोहोचल्यानंतर पीडित तरुणीने एका मित्राच्या मदतीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पुणे ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा मालेगाव पोलीस स्टेशनला वर्ग केला आहे. गुन्हा घडलेल्या दिवसापासून आरोपी तरुण हा पसार झालेला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

WhatsAppShare