सावधान! चोरट्यांची टायर चोरीची अजब शक्कल

1

भोसरी, दि. 7 (पीसीबी) : पासिंग करण्यासाठी घरासमोर पार्क केलेल्या ट्रकचे तीन टायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 4) सकाळी आठ वाजता ज्योतिबानगर, तळवडे येथे उघडकीस आली.

संदीप मधुकर भालेकर (वय 38, रा. ज्योतिबानगर, तळवडे) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भालेकर यांनी त्यांचा टाटा कंपनीचा 1109 ट्रक (एम एच 14 / ए एस 9973) पासिंग करण्यासाठी त्यांच्या घरासमोर पार्क करून ठेवला. रविवारी (दि. 3) रात्री अकरा ते सोमवारी सकाळी आठ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या ट्रकचे पुढील दोन आणि स्टेपनी असे 49 हजार रुपये किमतीचे तीन व्हीलसहित टायर चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

हेमंत कुमार ओंकारनाथ यादव यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 12 / ई जे 9175) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रुपीनगर येथील घारजाई हाऊसिंग सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली.

पिंपळे गुरव येथून नवज्योत सिद्धू जयकरण सिंग यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / बी व्ही 1336) चोरट्यांनी चोरून नेली. चिखली परिसरात आणखी एक वाहन चोरीचा प्रकार घडला.

भोसरी येथील पुणे-नाशिक महामार्गावरून परमेश्वर अण्णासाहेब गरड (वय 30, रा. वडमुखवाडी, दिघी) यांची 25 हजारांची दुचाकी (एम एच 44 / आर 6366) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsAppShare