सावधान… अखेर ओमिक्रॉन व्हेरिएंटचा ‘या’ राज्यात शिरकाव झालाच

295

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटाची चिंता सतावत असतानाच आता कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटने आणखी चिंतेत भर घातली आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटता शिरकाव झाला असून कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत ही बातमी दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील 29 देशात 373 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट बीटा आणि डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ओमिक्रॉनचे व्हेरियंटमध्ये आतापर्यंत 42 ते 52 म्युटेशन आढळळे आहे. आतापर्यंत आलेल्या अहवावानुसार हा व्हेरियंट सर्वात माईल्ड आहे.