सावता परिषद पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षपदी तुषार आल्हाट यांची निवड

186

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य सावता परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षपदी तुषार चंद्रकांत आल्हाट यांची नुकतीच निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या सुचनेनुसार मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

तसेच सोमनाथ वाघमारे यांची पिंपरी-चिंचवड शहर संघटकपदी, तर अनुज गायकवाड यांची पुणे शहर सोशल मीडिया प्रमुखपदी, सुरज भुजबळ यांची बानेर शहर संघटकपदी, महेश जगताप यांची भोसरी संघटकपदी, ज्ञानेश्वर वाघमारे यांची चिंचवड विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली .

यावेळी सावता परिषदेचे पिंपरी-चिंचवड शहर युवक आघाडी संपर्क प्रमुख चेतन वाघमारे, वडगांव शेरी मतदारसंघ अध्यक्ष प्रज्वल राऊत, उमेश ताजणे, प्रदीप वाघमारे, वासुदेव वाघमारे, आकाश नाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.