सारसबागेजवळील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; तीन तरुणींची सुटका

506

पुणे, दि. २१ (पीसीबी) – सारसबागेजवळील मसाज सेंटरवर दत्तवाडी पोलिसांनी छापा टाकून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफास केला. तीन महिलांची सुटका करून दोन एजंटला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. २०) दुपारी चारच्या सुमरास सारसबाग येथील लेमन अॅक्वा स्पा अॅन्ड सलुन मसाज सेंटर येथे करण्यात आली. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

मोना बलजिदर सिंग आणि सुनिल लक्ष्मण राठोड (रा. सायन कोळीवाडा चाळ, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या कारवाईत २७, २३, आणि २५ वर्षीय तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारसबाग परिसरातील लेमन अॅक्वा स्पा अॅन्ड सलुन मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकून तीन तरुणींची सुटका केली. तर दोन एजंटला अटक केली आहे. दत्तवाडी पोलिस तपास करत आहेत.