सारंग कामतेकर स्पोर्टस फाऊंडेशनकडून दिघीतील मॅगझीन चौकात माऊलींच्या पालखीचे जोरदार स्वागत

94

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – श्री सारंग कामतेकर स्पोर्टस फाऊंडेशन आणि चांगभले ग्रुपच्या वतीने दिघीतील मॅगझिन चौकात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच पालखीला भावपूर्ण निरोपही देण्यात आला.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. आळंदीतच मुक्कामानंतर शनिवारी पहाटे पालखी पुण्याच्या दिशेने निघाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आळंदीतील मॅगझिन चौकात माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.

श्री सारंग कामतेकर स्पोर्टस फाऊंडेशन आणि चांगभले ग्रुपच्या वतीनेही माऊलींच्या पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. दोन्ही संघटनांच्या वतीने पालखीत सहभागी वारकऱ्यांना वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी लष्करातील अनेक सैनिक, अध्यक्ष विशाल हाके, राहुल शेंडगे, सुशील संगापुरे व कार्यकर्ते उपस्थित होते.