सायको प्रेमी: भोसरीत अल्पवयीन मुलीसोबतचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन केली लग्नाची मागणी

213

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – अल्पवयीन मुलीसोबतचे अश्लिल फोटो तिच्या मामाला पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणाने त्या मुलीसोबत लग्न लावून देण्याची मागणी केली. ही धक्कादायक घटना मार्च २०१९ मध्ये दिघीतील सावंतनगर येथे घडली.

याप्रकरणी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमोल घरगिने (रा. सावंतनगर, दिघी. मुळ गाव. आरवी शिरुर कासार, बीड) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१९ मध्ये आरोपी अमोल याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओडले. तसेच तिच्या घरच्यांनी त्यांचे लग्न लावून द्यावे म्हणून त्याने या मुलीसोबतचे अश्लिल फोटो तिच्या मामाच्या व्हॉट्सअॅपवर पाठवले. तसेच लग्न लावून न दिल्यास ते फोटो फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी अमोल याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण अधिक तपास करत आहेत.