सायकल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे तळवडे आणि हिंजवडीतील आयटीयन्स हैराण

128

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – फिटनेस राखण्यासाठी तसेच प्रदुशन आणि इंधन वाचवण्यासाठी शहरातील आयटीयन्सनी विविध कंपन्यांच्या महागड्या सायकल वापरण्यास सुरुवात केली. मात्र चोरटे या सायकली चोरुन नेत असल्याने आयटीयन्सची डोकेदुखी वाढली आहे.

हिंजवडी आणि तळवडे आयटी पार्क येथे काम करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून त्यातील बरेचसे आयटीयन्स हिंजवडी, निगडी प्राधिकरण, पिंपळे सौदागर, वाकड, आकुर्डी, रहाटणीमध्ये स्थायिक झाले आहेत. मागील काही वर्षांपासून इन्फोसिस, कॉग्निझंट, पर्सिस्टंट, सिंटेल, विप्रो आदी आयटी कंपन्यांतील अनेक कर्मचारी दररोज व्यायामासाठी सायकलींचा वापर करतात. रोज घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घरी जाण्यासाठी हे कर्मचारी सायकलिंचा वापरत करतात. बऱ्याचशा आयटीयन्सकडे महागड्या सायकल आहेत. यामुळे चोरटे या सायकली चोरतात.

यावर आळा घालण्याची मागणी आयटीयन्स केली आहे. दरम्यान निगडी पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी विदेशी बनावटीच्या सायकली चोरणाऱ्या चोरट्यांना अटक केली होती. चोरट्यांकडून ८० सायकली जप्त करण्यात आल्या होत्या. त्यातील काही सायकली त्यांच्या मालकांनी परत नेल्या आहेत. तर जवळपास ५५ सायकली निगडी पोलिस ठाण्यात पडून आहेत. संबंधीत व्यक्तींनी त्यांच्या सायकली घेऊन जाव्यात असे आवाहन निगडी पोलिसांनी केले आहे.