“सामुदायिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यात देशातील लोकसंख्या अजून सक्षम नाही”

23

नवी दिल्ली,दि.२८(पीसीबी) – ‘करोना विषाणूच्या संसर्गाविरोधात सामुदायिक प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात देशातील लोकसंख्या अजून सक्षम नाही. ‘आयसीएमआर’च्या दुसऱ्या सेरो सर्वेक्षणात असे सूचित करण्यात आले आहे,’ असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.

‘संडे संवाद’दरम्यान सोशल मीडियावर संवाद साधताना हर्षवर्धन म्हणाले की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ही संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये पुन्हा संसर्ग झाल्याच्या अहवालांची तपासणी आणि संशोधन करीत आहे. मात्र, पुन्हा संसर्ग होण्याची प्रकरणे सध्या नगण्य आहेत. तरीही सरकार ही बाब अत्यंत गांभीर्याने घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लवकरच जाहीर करण्यात येणाऱ्या दुसऱ्या सेरो सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, कोणत्याही प्रकारची रोगप्रतिकारशक्ती मिळवण्यापासून आपण खूप दूर आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.

WhatsAppShare