सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक

63

मुंबई, दि.२६ (पीसीबी) : अनेक सोशल मीडिया अकाऊंट्स हॅक झाल्याच्या बातम्या अनेकदा तुमच्या वाचनात आल्या असतील. पण आता चक्क एका मंत्र्याचंच फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. तशी माहिती खुद्द मुंडे यांनीच दिली आहे. इतकंच नाही तर याबाबत फेसबुकला कळवण्यात आलं आहे. तसंच सायबर सेलकडेही तक्रार केल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. मी धनंजय मुंडे या अधिकृत अकाऊंटवरुन अॅडमीन आणि मॉडेरेटर म्हणून कुठलिही अॅक्टिव्हिटी करु शकत नाही. त्यामुळे फेसबुकने लक्ष देऊन लवकरात लवकर मला माझे अॅडमीनचे अधिकार देत पेज सुरु करावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी फेसबुककडे केलीय. तसंच याबाबत महाराष्ट्र सायबर सेलकडे आपण रितसर तक्रार दिल्याची माहितीही मुंडे यांनी दिली. दरम्यान, शिक्षण क्षेत्रात बीड पॅटर्न निर्माण व्हावा यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे केंद्र बीड जिल्ह्यात सुरू करण्यात येणार असून छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) केंद्र देखील जिल्ह्यात सुरू व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती मुंडे यांनी 19 ऑक्टोबर रोजी दिली होती.

WhatsAppShare