सामाजिक उपक्रमांनी मा. उपमहापौर तुषार हिंगे यांचा वाढदिवस साजरा.

139

पिंपरी, दि. ११ (पीसीबी): कोरोना विषाणू आणि ओमिक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक तुषार हिंगे यांचा वाढदिवसा रविवारी, दि. 9 जानेवारी 2022 रोजी सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

अनाथांचा आधार स्वर्गीय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या मांजरी येथील सन्माती बाल निकेतन संस्थेला भेट देऊन त्यांना आदरांजली वाहिली. तसेच, या संस्थेसाठी एक लाख रुपयांच्या मदतनिधीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४०० गरोदर महिला भगिनींना फळ वाटप करण्यात आले.

चिंचवड येथील गो शाळेत गाईंची सांभाळ करणाऱ्या संस्थेस ५० पोती शुगर कँडी गाईंसाठी लागणारे खाद्य देण्यात आले. बिजलीनगर चिंचवड येथील वृद्ध आश्रमासाठी आवश्यक मूलभूत वस्तू देण्यात आल्या. आकुर्डी येथील अनाथ आश्रमात लहान मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच, त्यांना १०० किलो गहू, १०० किलो तांदूळ आणि त्याचबरोबर लागणाऱ्या मूलभूत वस्तू देण्यात आल्या. चिंचवड मोहननगर येथील बुद्ध विहाराच्या नूतनीकरणाच्या कामासाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात आले. सामाजिक उपक्रमांचे आरंभ सोशल फाउंडेशन, तुषार हिंगे युवा मंचच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संयोजन केले