साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी प्रभाग क्रमांक १७ मध्ये जनजागृती रॅली

86

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – भाजपच्या नगरसेविका करूणा चिंचवडे यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांना आळा घालण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक १७ मध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली.

या रॅलीत वाल्हेकरवाडीतील प्रेरणा शाळेचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. संपूर्ण प्रभागात ही रॅली काढून विद्यार्थ्यांनी स्वच्छता पाळा, रोगराई टाळा, डंख छोटा-धोका मोठा, अशा जनजागृतीच्या घोषणा दिल्या. तसेच नगरसेविका करूणा चिंचवडे व महापालिकेच्या मलेरिया निर्मूलन पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी प्रबोधनात्मक पत्रके वाटली. यावेळी प्रेरणा शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, व मलेरिया निर्मूलन पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.