सात लाखांच्या फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

112

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – एक कार भाड्याने चालविण्यासाठी घेतली. दुस-या कारमध्ये भागीदारी म्हणून चार लाख रुपये घेतले. त्यानंतर दोन्ही कारचा अपहार केला. तिघांनी मिळून एका व्यक्तीची सात लाखांची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 13 डिसेंबर 2019 रोजी मोशी येथे घडली.

याप्रकरणी मुकेश पंजाबराव महानकर (वय 40, रा. बोराडेवाडी, मोशी) यांनी गुरुवारी (दि. 28) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राहुल बाळासाहेब सलगर (रा. खंडोबा माळ, भोसरी), महेश नरवडे, रंजित बाळासाहेब सलगर (रा. दिघी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल याने फिर्यादी यांची स्विफ्ट कार भाडे करार करून चालविण्यास घेतली. ती परत न देता भाडे कराराचे ठरल्या प्रमाणे पैसे न देता तीन लाखांची फसवणूक केली.

तसेच आरोपी महेश याने फिर्यादी यांच्याकडून भागीदारीत गाडी खरेदी करण्याचे अमिश दाखवून चार लाख रुपये घेतले. त्यानेही ठरलेल्या कराराप्रमाणे फिर्यादी यांना पैसे दिले नाहीत. तसेच फिर्यादी यांनी दिलेले चार लाख रुपये देखील आरोपीने परत दिले नाहीत. दोन्ही प्रकरणात फिर्यादी यांची सात लाखांची फसवणूक झाली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare