साताऱ्यात माझ्या जीविताला धोका, मला दिल्लीला जावे लागेल – रामराजे निंबाळकर

1967

सातारा, दि. ३ (पीसीबी) – साताऱ्यात माझ्या जीविताला धोका आहे, त्यामुळे मला आता दिल्लीला जावे लागेल, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे. साताऱ्याचा म्हणावा तसा विकासही झालेला नाही, त्यामुळे मला खाली जायचे नाही, तर मला वर जावे लागेल, असेही ते म्हणाले.   

फलटण येथील एका कार्यक्रमात निंबाळकर बोलत होते. यावेळी साताऱ्याचा विकास झालेला नाही, असे सांगून निंबाळकर यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उद्यनराजे यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी रामराजे म्हणाले की,  हा कार्यक्रम तळमजल्यावर आहे. तो वरच्या मजल्यावर घ्यायला हवा होता. आपण येथे खूर्ची टाकून बसू शकलो असतो, असे सांगून निंबाळकर यांनी आता मला खाली जायचे नाही. तर वर जायचे आहे. येथे माझ्या जीविताला धोका आहे. तसेच साताऱ्याचा म्हणावा तितका विकास झालेला नाही. त्यामुळे मला दिल्लीलाच जावे लागेल, असे ते म्हणाले.