साताऱ्यात पहाटे व्यायामाला गेलेल्या तिघांना कंटेनरने चिरडले

201

सातारा, दि.२३ (पीसीबी) – साताऱ्याच्या कऱ्हाड ते तासगाव रस्त्यावर शेणोली गावाच्या हद्दीत पहाटे व्यायामाला गेलेल्या तिघांना कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. साबळे वाडीपासून शेणोलीच्या गावच्या पोल्ट्रीजवळ सोमवारी (दि.23) पहाटे चौघेजण व्यायामाला गेले होते  त्यातील तिघांना भरधाव कंटेनरने चिरडले.या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

दीप ज्ञानू गायकवाड (वय ४५), प्रवीण हिंदुराव गायकवाड (४०) व विशाल धोंडिराम गायकवाड (३० तिघे रा.सम्राटनगर, शेणोली, ता. कहाड) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शेणोलीतील साबळे वाडीपासून शेणोलीच्या गावच्या पोल्ट्रीजवळ सोमवारी (दि.23) पहाटे पहाटे चौघेजण व्यायामाला जात असताना तिघांना भरधाव कंटेनरने चिरडले. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार  चौघांपैकी रोहित आनंदराव गायकवाड हा इतर तिघांपासून थोडा बाजूला व्यायाम करत होता. सुदैवाने तो या अपघातात बचावला आहे. शेजारीच वस्ती असल्याने बचावकार्य त्वरीत करण्यात आले. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती पसरताच घटनेस्थळी कराड तालुक्याचे पोलिसही दाखल झाले आहे.

WhatsAppShare