साताऱ्यात ट्रॅपमध्ये अडकणार कळताच एसीबीच्या दोन पोलिसांना चिरडून फौजदार फरार

2468

सातारा, दि. १० (पीसीबी) – साताऱ्यातील दहिवडी पोलिस ठाण्याचा फौजदार सतीश राजाराम दबडे (वय ५५) याने १३ हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर आज (शुक्रवार) त्याला रंगेहात पकडण्यासाठी सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ट्रॅप लावला होता. यावेळी ट्रॅपमध्ये आपण अडकणार हे लक्षात येताच फौजदार दबडे याने लाचलूचपत विभागाच्या दोन पोलिसांना कारने उडवून पसार झाला. या थरारक घटनेमुळे साताऱ्यासह महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी फौजदार सतीश दबडे याने काही जणांकडून १३ हजारांची लाच मागितली होती. ही तक्रार सातारा एसीबी विभागाकडे करण्यात आली. आज शुक्रवारी त्यानुसार एसीबीचे अजित करणे व काटकर आपल्या पथकासह दहिवडी येथे ट्रॅप लावून थांबले होते. ट्रॅप होणार हे दबडे याच्या लक्षात येताच त्याने कार त्या दोघांच्या अंगावर चडवून फरार झाला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सातारा पोलिस दबडे यांचा शोध घेत आहेत. या थरारक घटनेमुळे साताऱ्यासह महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ उडाली आहे.