साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजेंचे भाषण आंदोलकांनी रोखले

89

सातारा, दि. २५ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साताऱ्यात विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजेंनी भाषण सुरु केल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करत  त्यांचे भाषण बंद पाडले. त्यानंतर सुरू झालेल्या गोंधळामुळे आमदार शिवेंद्रराजे, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना माघारी फिरावे लागले.