सातारा-पुणे महामार्गावर कात्रज दरीपुलावरून भरधाव कार कोसळली

232

पुणे, दि. २० (पीसीबी) – सातारा-पुणे महामार्गावरील कात्रज दरीपुलावरून भरधाव वेगातील कार खाली कोसळून मोठा अपघात झाला. ही घटना आज (शनिवारी)  दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास  घडली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली. कारमधील दोघांना बाहेर काढण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज दरी पुलावरून भरधाव वेगातील कार खाली कोसळली. ही घटना तेथून जाणाऱ्या वाहनचालकांनी पाहिली. त्यावेळी त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, अग्निशमन दलाचे जवानांनी कारमधील दोघांजणाना बाहेर काढले. कारमधील दोघे जण पुण्यातील असल्याचे  सांगितले जात आहे.